इंटेलिजन्स ब्युरो मार्फत 797 पदांवर बंपर भरती जाहीर, आवश्यक पात्रता पहा?

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये 797 पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा ते mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

पदाचे नाव : 
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), ग्रेड II (तांत्रिक)

शैक्षणीक पात्रता?
इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये B.Sc किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर डिग्री.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. (नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. कृपया जाहिरात पाहावी)

पगार : 25,500-81,100/-

अर्ज फी
अनारक्षित, EWS आणि OBC – रु 500
इतर – 450 रु

निवड प्रक्रिया खालील प्रमाणे : 

ऑनलाइन लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

जाहिरात पहा : PDF