सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष पदवी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार २१ जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट : वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
इतका पगार मिळेल :
IBPS लिपिकाचे मूळ वेतन दरमहा 19,900 ते 47920 रुपये आहे.सोबत वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो. सुरुवातीला सामील झालेल्यांसाठी IBPS लिपिक पगाराशी संबंधित रोख रक्कम रु. 29453 आहे.
परीक्षेच्या तारखा :
PET: 12 ते 17 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2024
असा करा अर्ज
1. सर्व प्रथम उमेदवाराला अधिकृत वेबसाइट ibps.in वर जावे लागेल.
2. आता तुम्हाला Recent Updates वर जाऊन CRP- Clerk- XIV वर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
4. आता तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल.
5. आता तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
6. आता तुमचा अर्ज भरा.
7. यानंतर, तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्जाची फी भरा.
8. यानंतर तुम्ही कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
9. भविष्यातील संदर्भासाठी या पृष्ठाची प्रिंट आउट घ्या.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Click Here