---Advertisement---
IBPS PO Recruitment 2025 : बँकेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या भरती IBPS PO 2025 ची अधिसूचना जारी केली आहे.
अर्ज प्रक्रिया आज १ जुलैपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयबीपीएस वेबसाइट ibps.in ला भेट देऊन अर्ज भरू शकतात. या भरतीअंतर्गत देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये अधिकारी पदांवर नियुक्त्या केल्या जातील.
या भरतीअंतर्गत ५२०८ पदे भरली जाणार असून, अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क, तर एससी, एसटी आणि पीएच (दिव्यांग) प्रवर्गासाठी १७५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
---Advertisement---