---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : आयसीसीची घोषणा अन् टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, जाणून घ्या नेमकं काय झालं?

---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. १९ फेब्रुवारीपासून ही प्रतिष्ठित स्पर्धा पाकिस्तान आणि यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पंच आणि मॅच रेफरी पॅनेलची अधिकृत घोषणा केली आहे. या पॅनेलमध्ये अशा दोन पंचांचा समावेश आहे, ज्यांनी अनेकदा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी अडचणी निर्माण केल्या आहेत.

आयसीसीने मॅच रेफरी म्हणून ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, श्रीलंकेचे रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेचे अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांची निवड केली आहे. तसेच, पंचांच्या पॅनेलमध्ये कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, अहसान रझा, पॉल रायफेल, शराफुद्दुल्लाह इब्ने शाहिद, रॉड टकर, अ‍ॅलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन यांचा समावेश आहे.

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

या पॅनेलमध्ये रिचर्ड केटलबरो यांचा समावेश विशेषतः भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. इतिहास पाहता, ICC च्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये केटलबरो पंच असताना भारतीय संघाला निर्णायक सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

केटलबरो यांच्या पंचगिरीत भारताचे पराभव

२०२३ वनडे वर्ल्ड कप फायनल
२०२१ आणि २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल
२०१५ वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल
२०१४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल
२०१६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सेमीफायनल

भारतीय संघाच्या संधी आणि आव्हाने

भारतीय संघाकडे अनुभवी फलंदाज व गोलंदाजांचा उत्तम समतोल आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तर, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांच्यावरही मोठी जबाबदारी असणार आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धचा सामना हा सर्वाधिक चर्चेचा ठरणार आहे. दुबईच्या खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान लढत अत्यंत चुरशीची होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment