आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे, तर अंतिम सामना 9 मार्चला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होतील, आणि त्यांना 4-4 अशा दोन गटांत विभागले जाईल. इंग्लंडने आपला संघ जाहीर केला असून जॉस बटलर कर्णधार असेल. इतर संघांकडून अद्याप संघांची घोषणा झालेली नाही. 12 जानेवारी ही संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख आहे.
टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळणार आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचाही संघात समावेश अपेक्षित आहे. याच दरम्यान रोहितचा विश्वासातला युवा फलंदाज श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीने आपल्या निवडीसाठी दावा मजबूत केला आहे.
श्रेयस अय्यरची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
श्रेयसने रणजी ट्रॉफीत 90 च्या सरासरीने 452 धावा केल्या, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 49 च्या सरासरीने 345 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीत श्रेयसने 5 सामन्यांत 2 शतकांसह 325 धावा केल्या असून, त्याला एकाही गोलंदाजाने बाद केलेले नाही.
श्रेयस अय्यरची पुनरागमन कथा
गेल्या काही महिन्यांत श्रेयसला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. वार्षिक करारातून वगळले जाणे आणि दुखापतीमुळे टीमपासून दूर राहावे लागले. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना आणि ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. मात्र, या काळात श्रेयसने आपले क्रिकेट कौशल्य सुधारून देशांतर्गत स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
रोहितचा विश्वासातला खेळाडू
श्रेयस अय्यर हा रोहित शर्माचा खास भिडू असून त्याने चौथ्या स्थानी आपली छाप सोडली आहे. मुंबईचा खेळाडू म्हणून रोहितला श्रेयसच्या क्षमतेवर पूर्ण वि