ICC Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान सामना : आयसीसीची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर!

ICC Champions Trophy 2025 : बहुप्रतिक्षित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला बुधवार, 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. गतविजेता पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद आहे, मात्र टीम इंडियाचे संपूर्ण सामने दुबईत खेळवले जाणार असल्याने ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने पार पडणार आहे. एकूण 8 संघांना 4-4 अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.

 ग्रुप A : भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड
ग्रुप B : ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड

हेही वाचा : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली

टीम इंडियाचे सामने : भारत आपल्या मोहिमेतील पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र, सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष 23 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्याकडे लागले आहे. हा सामना दुबईत होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अंपायर्सची निवड : भारत-पाकिस्तान सामना हा कायमच हायव्होल्टेज ठरतो. अशा सामन्यांमध्ये अंपायर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे ICC ने या सामन्यासाठी अनुभवी पंचांची नियुक्ती केली आहे.

फिल्ड अंपायर: पॉल रायफल, रिचर्ड इलिंगवर्थ

टीव्ही अंपायर: मायकल गॉफ

फोर्थ अंपायर: एड्रियन होल्डस्टॉक

मॅच रेफरी: डेव्हिड बून

हे सर्व अनुभवी अंपायर असून, त्यांना मोठ्या स्पर्धांमधील पंचगिरीचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे या सामन्यात तटस्थ आणि योग्य निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ

कर्णधार: रोहित शर्मा

उपकर्णधार: शुबमन गिल

विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघ

कर्णधार: मोहम्मद रिजवान

सलमान अली आगा, बाबर आजम, फखर जमां, सऊद शकील, कामरान गुलाम, खुशदिल शाह, तैयब ताहिर, उस्मान खान, फहीम अशरफ, शाहीन शाह अफ्रिदी, हारिस राऊफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत कोणता संघ विजयी ठरणार? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला कोण जिंकणार? याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. 23 फेब्रुवारी रोजी होणारा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.