ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला आज, बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान करणार आहे, तर न्यूझीलंड संघाची धुरा फिरकीपटू मिचेल सँटनर सांभाळणार आहे.
सामना कुठे आणि किती वाजता?
सामना: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
दिनांक: बुधवार, 19 फेब्रुवारी 2025
स्थळ: नॅशनल क्रिकेट स्टेडियम, कराची
सुरुवातीची वेळ: दुपारी 2:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
टॉस: दुपारी 2:00 वाजता
लाईव्ह सामना कुठे पाहता येईल?
क्रिकेटप्रेमी हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर थेट पाहू शकतात. तसेच मोबाईल आणि लॅपटॉपवर सामना पाहण्यासाठी जिओ सिनेमा आणि हॉटस्टार हे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील.
कोण भारी?
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत एकूण 118 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यातील आकडेवारी अशी आहे. पाकिस्तानने 61 सामने जिंकले, न्यूझीलंडने 53 विजय मिळवले. 3 सामने अनिर्णित राहिले. 1 सामना टाय झाला. ही आकडेवारी पाहता पाकिस्तानचा न्यूझीलंडवर थोडासा वरचष्मा दिसतो, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत कोणताही संघ उलटफेर करू शकतो.
संभाव्य प्लेइंग
पाकिस्तान संघ : मोहम्मद रिझवान (कॅप्टन, विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हन कॉन्वे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, कायल जेमिसन, जेकब डफी