ICC Champions Trophy 2025 : टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध पहिला सामना दुबई येथे खेळत आहे. सामन्याच्या नाणेफेकीचा कौल बांगलादेशने जिंकला असून दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार सुरुवात करत पहिल्या दोन षटकांतच बांगलादेशला दोन मोठे धक्के दिले आहेत.
बांगलादेशचा डाव अत्यंत खराब सुरू झाला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत बांगलादेशी फलंदाजांना तग धरू दिला नाही. पहिल्या षटकातच मोहम्मद शमीने बांगलादेशचा सलामीवीरला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हर्षित राणाने आणखी एक विकेट घेत भारतीय संघाला उत्तम सुरुवात करून दिली.
बांगलादेशच्या फलंदाजांवर आता जबरदस्त दबाव निर्माण झाला आहे. मधल्या फळीतील फलंदाजांवर संघाला स्थिरता देण्याची मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांचा मारा पाहता त्यांचा डाव संपूर्णपणे उधळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने आक्रमक रणनीती अवलंबली असून, पहिल्या काही षटकांमध्येच सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आता बांगलादेशच्या फलंदाजांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. अन्यथा, हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता आहे.