ICC Champions Trophy 2025 final : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, साखळी सामन्यामध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा पराभव केला. तर उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मोठ्या थाटात फायनल गाठली, तर दुसरीकडे न्यूझीलंडनी उपांत्यफेरीत साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. त्यानंतर आज न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यात अंतिम सामनाचा महामुकाबला होत आहे. त्यामुळे या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
विशेषतः नैरोबी येथे १५ ऑक्टोबर २००० मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौरव गांगुलीच्या भारतीय संघाला स्टीफन फ्लेमिंगच्या न्यूझीलंडने ४ गढ़चांनी धूळ चारली होती.
आता त्या घटनेला २५ वर्षे झालीय. त्यामुळे आज, रविवारी त्या पराभवाचा वचपा काढून पुन्हा एकदा चैम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या महामुकाबल्यामध्ये भारताचं पारडं जड मानलं जात आहे, कारण या स्पर्धेत भारतानं अजून एकही सामना गमावलेला नाही, तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र भारताकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे या महामुकाबल्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.