ICC Champions Trophy 2025 final : डेरिल मिशेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी केलेल्या अर्धशतक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात २५१ धावांचा डोंगर उभा केला आहे. आता टीम इंडिया २५१ धावांच टार्गेट पार कर करेल का? हे पाहावं लागणार आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. आता फलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
आता ही अनुभवी जोडी विजयी धावांचा पाठलाग करताना कशी बॅटिंग करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ