---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : संघातून माजी कर्णधारालाच डच्चू; जाणून घ्या संपूर्ण टीम

---Advertisement---

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याचे आज, रविवारी अखेरची तारिख असल्याचे समजत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर आता बांगलादेशनेही आपल्या संघाची घोषणा केली असून, नझमुल हसन शांतोला कर्णधार म्हणून निवडले आहे. अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह यांना संघात स्थान मिळाले आहे.

मात्र, बांगलादेशच्या माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

शाकिब अल हसनचा गोलंदाजी अॅक्शन चेन्नईत चाचणीत नापास झाला होता, ज्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले  नाही. याव्यतिरिक्त, लिटन दासलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.

बांगलादेशने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. यावेळी देखील संघ आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध दुबईत होईल, आणि त्यानंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धचे महत्त्वाचे सामन्यांची प्रतीक्षा आहे.

बांगलादेश संघ 

नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकीर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजूर, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा.

टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सखोल विश्लेषण करणाऱ्या बैठकीनंतर निवड समितीची चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी बैठक झाल्याचे समजते; परंतु संघ जाहीर करण्यासाठी आजची अंतिम मुदत असल्याने भारतीय संघाचीही आज घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment