मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ‘मिनी वर्ल्डकप’ म्हणून ओळखली जाते. वनडे वर्ल्डकप गमावल्यानंतर भारतीय संघाकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केलेल्या आठ संघांना या स्पर्धेत स्थान मिळालं आहे. मात्र, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांनी त्यांचे चमू जाहीर केले असले तरी भारतीय संघाचा अधिकृत संघ जाहीर करण्यात उशीर होत आहे.
हेही वाचा : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, चॅम्पियन्स ट्रॉफी संघाबाबत प्रश्नचिन्ह ?
बीसीसीआयने आयसीसीकडे अधिक वेळ मागितल्याच्या चर्चा आहेत. संघ जाहीर करण्यात होणाऱ्या या विलंबाचं प्रमुख कारण जसप्रीत बुमराहची दुखापत असल्याचं बोललं जात आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान सिडनीच्या दुसऱ्या डावात बुमराहला पाठिच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नाही. त्याला आता नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये रिहॅब प्रक्रियेतून जावं लागणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे.
वृत्तानुसार, बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात बरा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानं स्पर्धेतील काही सामने गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत तो खेळणार का, यावर अजूनही साशंकता आहे.
भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मजबूत संघ उभा करायचा असल्याने बुमराह आणि कुलदीपसारख्या खेळाडूंची अनुपस्थिती मोठी कसरत ठरू शकते. क्रीडाप्रेमींना आता संघ जाहीर होण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जाहीर झालेले संघ
दक्षिण आफ्रिका संघ :
टेम्बा बावूमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, तबरेज शम्सी, टोनी दी झोर्झी, रासी वॅन डर डुसेन, मार्को यान्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रियान रिक्झेलसी
न्यूझीलंड संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, डॅरिल मिचल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, बेन सियर्स, विल ओ’रुर्के
ऑस्ट्रेलिया संघ :
पॅट कमिन्स ( कर्णधार), अॅलेक्स केरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झम्पा.
अफगाणिस्तान संघ:
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झाद्रान, रेहनुल्लाह गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रेहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नाईब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झाद्रान.
बांगलादेश संघ :
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तान्झिद हसन तमीम, सौम्या सरकार, परवेझ हुसैन इमॉन, मुशफिकुर रहीम, तौहिद हृदोय, महमुदुल्ला, मेहिदी हसन, जाकेर अली अनिक, रिशाद हुसेन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा, मुस्तफिझुर रहमान, तस्किन अहमद
इंग्लंड संघ :
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.
पाकिस्तान संघ : मोहम्मद रिजवान (कर्णधार) (विकेटकीपर), बाबर आजम, सईम अयूब, तय्यब ताहिर, इरफान खान नियाजी, सुफियान मुकीम, मोहम्मद हसनैन, अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, सलमान अली आगा, इमाम-उल-हक, फखर जमान, हसीबुल्लाह आणि अब्बास आफ्रिदी.