ICC Champions Trophy 2025 : ठरलं ! भारतीय संघाची घोषणा केव्हा आणि किती वाजता होणार ? जाणून घ्या…

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने 18 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं समोर आलं आहे.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेत दुपारी 12:30 वाजता हा संघ जाहीर करतील. जसप्रीत बुमराहची दुखापत आणि संघ निवडीतील इतर मुद्द्यांमुळे आयसीसीकडून वाढीव मुदत मागितली गेली होती. त्यामुळे संघ जाहीर होण्यास विलंब झाला.

हेही वाचा :  दीर-भावजयच्या नात्याला काळिमा; राहत्या घरात… शहरात खळबळ

भारतीय संघाचे वेळापत्रक (चॅम्पियन्स ट्रॉफी 2025) 

20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश (दुबई)
23 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
2 मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड (दुबई)
4 मार्च: पहिली सेमी फायनल (दुबई)
5 मार्च: दुसरी सेमी फायनल (लाहोर)
9 मार्च: अंतिम सामना (लाहोर; टीम इंडिया पोहोचल्यास दुबई)
10 मार्च: अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर,
ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव/अक्षर पटेल/वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

क्रिकेटप्रेमींसाठी ही घोषणा ऐतिहासिक ठरणार असून, टीम इंडियाच्या संभाव्य संघातील नावांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.