भारतातील दोन मोठ्या खाजगी बँकांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी यांनी त्यांच्या एमसीएलआर दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आणखी या बँकांव्यतिरिक्त इतर कोणत्या बँकांनी FD वरील व्याजदर कमी केलाय, हे जाणून घेऊया.
आयसीआयसीआय बँक आता २७१ दिवस ते १ वर्षाच्या ठेवींवर ५.७५% व्याज देत आहे, जे पूर्वीपेक्षा २५ बेसिस पॉइंट्सने कमी आहे. १८ महिने ते २ वर्षांच्या ठेवींवरील व्याजदर ३५ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ६.५०% झाला आहे. ५ वर्षे ते १० वर्षांच्या ठेवींवरील व्याजदर १० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ६.६०% झाला आहे. याशिवाय, टॅक्स सेव्हर एफडीचा व्याजदर १५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे, जो आता ६.६०% आहे.
रेपो दरात कपात
शुक्रवारी झालेल्या एमपीसी बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी आरबीआयने रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यासारख्या मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांनी आधीच त्यांचे रेपो-लिंक्ड कर्ज दर ५० बेसिस पॉइंटने कमी केले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बँका भविष्यात बचत बँक खात्यांवरील व्याजदर २५-५० बेसिस पॉइंटने कमी करू शकतात.
‘या’ बँकांनीही केली कपात
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेव्यतिरिक्त, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका कॅनरा बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही एफडीवरील व्याजदर कमी केला आहे. आरबीआयने रेपो दर कमी केल्यापासून, बँका एफडीवरील व्याजदर सतत कमी करत आहेत.