Politics Maharashtra : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्यच राजकीय वर्तुळ चांगलंच तापलं आहे. रोजच एकमेकांवर आरोप-प्रत्याआरोप केले जात आहेत. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहित आहे शिवसेना कुणाची. हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय. त्यांना भारतीय लोकांवर विश्वास नाही.’ तसंच, ‘उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलंय. रोज लोकं सोडून जात आहे.’, अशी टीका त्यांनी केली.
‘मोदीजींचा ऐकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशानं पसंती दिली आहे. मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटतेय.’, असा देखील घणाघात यावेळी बावनकुळे यांनी केला.
तसंच, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, संधी मिळाली होती पण त्यात ते अपयशी ठरले. त्यांच्या काळात 4 हजार कोटी कंपन्यांनी खाऊन टाकले. खोटं बोलू पण रेटून बोलू अशी उध्दव ठाकरे यांची अवस्था झाली.’, असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.