बीट आणि गाजरमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. सुमारे एक कप उकडलेले बीटरूट आणि गाजर ब्लेंडरमध्ये घालून चांगले मिसळा आणि रस गाळून घ्या, त्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि सकाळी नियमितपणे सेवन करा. लिंबाच्या रसामुळे व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते आणि लोहाचे शोषण वाढते.