जामनेर हादरले! वाहनात बेकायदेशीर गॅस भरणे पडले महागात, पाच गॅस सिलेंडरचा स्फोट

---Advertisement---

 

जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात अवैध गॅस भरण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. अशात जामनेर शहरात एका खाजगी वाहनात अवैधपणे गॅस भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सुदैवाने जीवितहानी टळली असून, या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील बोदवड रोड भागातील एकता नगर परिसरात एक ओमनी गाडी ही गॅस भरण्यासाठी एका गोडाऊनमध्ये आली होती. दरम्यान, गॅस भरताना अचानक स्फोट झाला. यामुळे ओमनी व एका मोटरसायकलसह गोडाऊनचे पत्रे जळाले असून, लाखोंचे नुकसान झाले आहे.

पाच सिलेंंडरचा झाला स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, यात पाच सिलेंंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसर हादरून सोडले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात संशयित शेख सलीम शेख शब्बीर व गोडाऊन मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी रेहान यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी तहसीलदारांची भेट

घटनास्थळी जामनेर पोलीस स्टेशनचे पीआय कासार व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी भेट दिली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू कायदा 3/7 भारतीय न्याय संहिता कलम 287 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---