अन् थेट चार ते पाच राऊंड केले फायर, जळगावात नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

 

जळगाव : कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाला. ही घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. यात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील एमआयडीसी जी सेक्टर १४ मध्ये ‘विजेता इंडस्ट्रीज’ नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगार सरफू शेख नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना, कंपनीजवळ असलेल्या एका टपरीवर थांबला. याच ठिकाणी दारु अड्ड्याचा चालक एकाला मारहाण करत होता. सरफू शेख याने हे पाहिले असता, दारु विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीनंतर सरफू शेख याने कंपनीत काम करणाऱ्या आपले दोन्ही भाऊ राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना मदतीसाठी बोलावले. दोघे भाऊ सरफूसह कंपनी बाहेर आले असता, त्या दारु विक्रेत्याने त्यांना देखील शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने दारु विक्रेत्याला गावठी पिस्तुल दिले. त्या दारु विक्रेत्याने कामगारांच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले.

या गोळीबारामध्ये राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---