गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक ; 6 लाख 40 हजारांचा मुद्देमाला जप्त

---Advertisement---

 

पाचोरा, प्रतिनिधी : गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत लाख 40 हजारांचा मुद्देमाला जप्त केला आहे.

जळगाव एलसीबी पथकाला दि. 19/8/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून रात्री ट्रक क्रमांक (MH – 41/G -7296 )ची तपासणी केली असता तिच्यामध्ये 12 गौवंश जातीचे पशु हे सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता, दोरीने बांधून कोंबून घेऊन जात असताना मिळून आल्याने आरोपी नामे 1)अनिल नामदेव जाधव ( वय -40 )(रा.पिंपरखेड तांडा ता. चाळीसगाव) व 2) रवींद्र राजेंद्र पवार ( वय- 25) ( रा.पिंपरखेड तांडा ता. चाळीसगाव) यांचे विरुद्ध भडगाव पो. स्टे. गु र न 301/25 प्राणी छळ अधिनियम 1960 कलम 11 इतर नुसार गुन्हा दाखल करून एकूण 6,40,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल व दोन्ही आरोपी भडगाव पोस्टेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई ही एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे,पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटीलपोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार,पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील,पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---