१ हजार १५६ गावात होणार रोषणाई

तरुण भारत लाईव्ह ।२१ जानेवारी २०२३। जिल्ह्यातील 1,156 ग्रामपंचायतीच्या गावातील पथदिव्याच्या मीटरच्या वीज बिलासाठी शासनाकडून ग्रामपंचायत स्तरावर 19 कोटी 84 लाख 64 हजार रक्कम अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींचे 365 वीज मीटर आहेत. जामनेर तालुक्यातील जिल्ह्यात सर्वाधिक 106 ग्रा.पं.च्या 28 वीज मीटरसाठी 2 कोटी 41 लाख शासनाकडून अनुदान ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ही रक्कम ग्रामपंचायतींना अदा करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील 113 ग्रामपंचायतींच्या 33 वीज मीटरच्या बिलापोटी 2 कोटी 34 लाख 39 हजार अदा करण्यात आले आहेत. जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाकडून ही रक्कम थेट ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर रावेर तालुक्यातील 95 ग्रामपंचायतींच्या 13 मीटरसाठी 1 कोटी 75 लाख 20 हजार रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर चोपडा, पाचोरा तालुक्यासाठी दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम ग्रामपंचायतींना पथदिव्यांच्या वीज बिलासाठी देण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1156 गावातील पथदिव्यांच्या भरलेल्या बिलामुळे या गावातील अंधार दूर होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 902 ग्रामपंचायतींसाठी 28 कोटी 8 लाख निधी पथदिव्यांच्या वीज बिलासाठी देण्यात आले होते.

 

 जिल्ह्यातील तालुकानिहाय गावे, ग्रामपंचायत, वीजमीटर संख्या, रक्कम पुढीलप्रमाणे

  तालुका ग्रा.पं. संख्या मीटर प्राप्त रक्कम
अमळनेर 119 40 1 कोटी 40 लाख 37 हजार
भुसावळ 39 20 1 कोटी 3 लाख 60 हजार
भडगाव 49 15 45 लाख 38 हजार
बोदवड 38 13 52 लाख 31 हजार
चाळीसगाव 113 33 2 कोटी 34 लाख 39 हजार
चोपडा 90 39 1 कोटी 73 लाख 25 हजार
धरणगाव 75 31 98 लाख 8 हजार
एरंडोल 52 18 68 लाख 5 हजार
जामनेर 106 28 2 कोटी 41 लाख
मुक्ताईनगर 61 16 1 कोटी 32 लाख
पाचोरा 100 36 1 कोटी 69 लाख 38 हजार
पारोळा 83 83 1 कोटी 15 लाख 35 हजार
रावेर 95 13 1 कोटी 75 लाख 20 हजार
यावल 67 09 1 कोटी 56 लाख 39 हजार