नेमसुशिल शैक्षणिक समूहातील गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

---Advertisement---

 

तळोदा : शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी विविध कलापथकांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक भूमिकेच्या माध्यमातून आपली कला सादर केली. त्यात नारी शक्ती, आदिवासी नृत्य, हनुमान चालीसा, शिव तांडव व मुलींचे ढोल पथक अशा विविध पथकांनी शहरवासीयांचे मने जिंकली. यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे प्रत्येक वर्षी डोळे दिपवणारा विसर्जन सोहळाचे आयोजन होत असते. ह्यावर्षी देखील 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर आपली कला सादर केली. याप्रसंगी विसर्जन सोहळा प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष निखील तुरखीया, संचालिका सोना तुरखीया, उपाध्यक्ष डी. एम. महाले, सचिव संजय पटेल, समन्वयक हर्षिल तुरखीया मुंबई येथील विशेष मान्यवर यांनी देखील उपस्थित राहून उत्साह द्विगुण केला.

कलापथकाच्या मार्गदर्शनासाठी विद्यामंदिरातील मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, मुख्याध्यापक सुनिल परदेशी, प्रिन्सिपल पी. डी. शिंपी मुख्याध्यापिका भावना डोंगरे, मुख्याध्यापक गणेश बेलेकर, उप प्राचार्या कल्याणी वडाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कलापथक प्रमुख शिक्षक संदिप चौधरी, अरुण कुवर, रेखा मोरे, आय. पी. बैसाने, रविंद्र गुरव, मुकुंदा महाजन, सचिन पंचभाई, अश्विनी भोपे, सचिन पाटील, दिपाली व्ही.पाटील, प्रतिभा बैसाने, अक्षता बारी, सुनीता वसावे, सरिता नाईक, श्री. बादल आदी कलाप्रमुखांनी नेपथ्य सांभाळले. सर्व पथकांना नृत्य दिग्दर्शन शरद सावळे यांनी विशेष परिश्रम घेऊन केले. यशस्वीतेसाठी नेमसुशिल समूहाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी समवेत मोती बँक शाखेतील सर्व व्यवस्थापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---