---Advertisement---

धक्कादायक! अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

---Advertisement---

श्रावस्ती ।  उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एका धक्कादायक हत्येच्या घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना हरदत्त नगर गिरंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंसरी गावात घडली.

भेंसरी गावातील रहिवासी राजा बाबू याची 30 जानेवारीच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राजा बाबूच्या वडिलांनी जुन्या वादातून पाच जणांविरोधात आणि आठ अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून आणि अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिस अधीक्षक घनश्याम चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजा बाबूचे लग्नाच्या आधी बहराइच जिल्ह्यातील नगरौर गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या महिलेचा पती रानू याला याचा संशय होता. लग्नानंतरही राजा बाबू या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करत होता.

राजा बाबूच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या रानूने आपल्या पत्नीच्या मदतीने हा कट रचला. 30 जानेवारीच्या रात्री रानूने आपल्या पत्नीला राजा बाबूला आंब्याच्या बागेत बोलवण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे राजा बाबू तिथे पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या रानू आणि त्याच्या मित्र उपेंद्र यादवने त्याच्यावर लोखंडी साखळी, पाईप आणि चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात राजा बाबूचा जागीच मृत्यू झाला.

तिघांना अटक

या प्रकरणात रानू, त्याची पत्नी आणि मित्र उपेंद्र यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे ‘चाकू, लोखंडी साखळी, पाईप’ जप्त करण्यात आले आहेत. तसेच, राजा बाबूच्या मोबाईलचे रक्ताने माखलेले कव्हर, एक मोबाईल आणि दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment