महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी घेण-देण नाही. जनतेला मोठे-मोठे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे. ज्याप्रमाने अलीबाबा ४० चोरांची टीम होती. ते जनतेला लुटायचे, आज सरकारची देखील तीच अवस्था आहे, यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने परवा सुलतानी जी आर काढला. राज्यात रिक्त असलेल्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या करार करुन नियुक्ती करावी, तरुणांच्या ही कुऱ्हाड आहे. तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपने महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न करणे. ईडीची भिती दाखवून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. मलाईदार खात्यांसाठी खातेवाटप रखडला. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.