‘वन नेशन वन इलेक्शन’साठी आज महत्वाची बैठक!

 दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी समिती स्थापन केली आहे. आगामी विशेष अधिवेशनात सरका याबाबत विधेयक आणण्याची शक्यता आहे. 

 ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीची पहिली अधिकृत बैठक आज माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी १८ ते  २२ सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. या पाच दिवसीय अधिवेशनात मोदी सरकार  ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडू शकते.

 काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारावर भर देत आहेत. कारण असे केल्याने निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल आणि वेळेचीही बचत होईल. कोविंद यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा केंद्राचा निर्णय सरकारचे गांभीर्य दर्शवतो.