हिंदू आणि इस्लाममध्ये स्त्रीचे स्थान

– डॉ. विवेक राजे
सध्या सगळ्याच माध्यमांमधून गाजत असलेला विषय म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! एका अंगाने विचार करताना असे लक्षात येते की, लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमानांना आपली लोकसंख्या वाढवतानाच हिंदू समाजाला अपमानित करायचे आहे. स्त्रिया या आमच्या समाजाच्या मानबिंदू आहेत, होत्या आणि राहतील. एखाद्या समाजाला ‘तुम्ही आमचे गुलाम आहात’, ‘तुम्ही कुचकामी भेकड आहात’ असे जर दाखवायचे असेल, तर त्या समाजाच्या मानबिंदूची अवहेलना करण्याची अनादिकाळापासूनची पद्धत आहे. ही पद्धत ख्रिश्चन आणि इस्लाम आक्रमकांनी नेहमीच वापरली, असे इतिहास सांगतो. त्यामुळे त्यांच्या प्रार्थनास्थळांतून, मशिदीतून वा कुटुंबातून या प्रकारच्या संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. पुन्हा कोणत्याही प्रकारे पळवून आणलेल्या अशा हिंदू स्त्रीला जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही आर्थिक, सामाजिक, संसाधनांशिवाय, सुरक्षिततेशिवाय, सोडून देण्याची एक व्यवस्था आणि मानसिकता त्या समाजाने जोपासली आहे. ज्या ज्या गोष्टी आम्हाला पूजनीय वाटतात, ज्या ज्या गोष्टी आम्ही आपल्या जीवनात श्रेयस समजतो, त्या त्या गोष्टी अपमानित करण्याचे हे एक कारस्थानच होय.

पण आज आमच्या कुटुंबांमधून आमच्याच धर्माने स्त्रीला दिलेले सर्वोच्च स्थान चर्चिले जात नाही. इतर धर्मांचा आणि विशेषत: इस्लामचा स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन आमच्या मुलींना, कुटुंबाला सांगितलाच जात नाही, हेही दुर्दैवाने मान्य करावे लागते. मुद्दा हिंदू धर्मात आणि समाजात स्त्रीचं असलेलं स्थान आणि इस्लामी समाजात वा धर्मात असलेलं स्त्रीचे स्थान याचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा आहे. यासाठी हिंदू धार्मिक साहित्यात, हिंदू वाङ्मयात स्त्रीला दिलेले स्थान, महत्त्व, तिचे केलेलं चित्रण याची मुस्लिम धार्मिक साहित्यात स्त्रीला दिलेले स्थान आणि महत्त्व यांचा अभ्यास केला पाहिजे.  तसेच तुलनात्मक विचार करून, तो विचार समाजापुढे पुन्हा पुन्हा मांडला पाहिजे. हिंदू धर्मात स्त्री ही देवी आहे. माता म्हणून पूजनीय आहे. भगिनी म्हणून आदरणीय आहे. तिच्यातच प्रजननाची, पुनर्निर्माणाची क्षमता असल्याने तिला शक्तीचे रूप मानले जाते. हे सगळे विशेष हिंदू धर्मात आहेत. पण इस्लाममध्ये तिला आदराचे स्थान नाही. स्त्रीला ‘जन्नत नसीब नही होती.’ नवरा तिच्यावर खूश असतानाच जर ती मरण पावली तरच तिला जन्नत मिळते, अन्यथा नाही.

सारे जग उपभोगण्यासाठी आहे, परंतु त्यातील सर्वात उत्तम वस्तू म्हणजे चांगली स्त्री, हे अरुण शौरी यांनी त्यांच्या ‘वर्ल्ड ऑफ फतवाज’ या पुस्तकात पृष्ठ ३५२ वर पैगंबरांचे हदिसच्या संदर्भातील सांगितले जाणारे वचन उद्धृत केले आहे. इस्लामचा स्त्रीविषयक दृष्टिकोन एक भोगवस्तू असाच आहे. हिंदू धर्मात स्त्रीला असलेले आदराचे, सन्मानाचे स्थान इस्लाममध्ये नाही, असेच म्हणावे लागते. धर्मातील स्त्रीचे असलेले स्थान विचारात न घेता, आजच्या हिंदू आणि मुस्लिम समाजातील स्थानाचा विचार केला तरी त्यातही प्रचंड तफावत असल्याचे लक्षात येते. हिंदू कुटुंबात वा समाजात आज बहुसंख्य स्त्रिया या शिक्षित आहेत. यांना लिहिता-वाचता येते. अनेक स्त्रिया या कुटुंबासाठी अर्थार्जन करताना दिसतात किंवा आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकडे लक्ष देताना दिसतात.

बहुसंख्य हिंदू कुटुंबात घरातील स्त्रियांच्या मताचा विचार केला जातो. हिंदू समाज सर्वसाधारणपणे एकपत्नीत्वाचे पालन करतो. हिंदू धर्मात जरी बहुपत्नीत्वाला मान्यता असली, तरी समस्त हिंदू समाजाचा आदर्श प्रभू श्रीराम एकपत्नीत्वाचे पालन करणारा आहे. त्याच आदर्शाचे आज हिंदू समाज पालन करताना दिसतो. याला अपवाद निश्चित आहेत, पण अपवाद हे नियम नसतात, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय हिंदू विवाह कायदा एक पत्नी असताना दुसरा विवाह अवैध ठरवतो. हिंदू समाज एक अतिशय उदार आणि खुला समाज असल्याने जुन्या कल्पनांना चिकटून बसलेला नाही. नव्या विचारांचे, कल्पनांचे स्वागत करणारा आहे. women in Islam स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे, स्वतंत्र विचार मांडणे, जीवनाच्या वेगळ्या वाटा चोखाळणे याचे या समाजाने स्वागतच केले आहे.<कालबाह्य प्रथा-परंपरा आणि विचार; मग ते धार्मिक असोत, सामाजिक असोत वा व्यवसायविषयक असोत, हा समाज डोक्यावर घेत नाही. मुळात उदारमतवादी असल्याने अनेक बदलांचे स्वागत करण्याची या समाजाची तयारी असते. त्यामुळे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान या समाजात आज प्राप्त झाले आहे. अनेक क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगले काम करू शकतात, हे हिंदू समाजाने आज मान्य केले आहे. याउलट मुस्लिम समाजाची स्थिती आहे. हा समाज आजही स्थितिशील आहे. मुळात कुराण हे थेट ‘अल्लाह’च्या मुखातून आलेले असल्याने, त्यात काही बदल करणे हा समाज नाकारतो.

यातील आयाता किंवा हदिसमध्ये सांगितलेल्या नियमांचा कालसुसंगत असा अर्थ काढणे या समाजाला मान्य होणारे नाही. त्यातच बहुतेक भारतीय मुस्लिम हा एका बाजूला कालबाह्य ठरणा-या धर्म समजुती व त्यातून येणारी अतिरेकी कट्टरता तर दुसरीकडे अतिशय वेगवान जीवन प्रवाह यांच्या कात्रीत सापडलेला दिसतो. जगण्यासाठी त्याला देशात असलेली हिंदू बाजारपेठ हवी असते. त्यामुळे तिथे त्याला कालसुसंगत असा लवचीक पवित्रा ठेवावाच लागतो. तर, त्याचवेळी मुल्ला मौलवीच्या आग्रही इस्लामचे पालन करावे लागते. women in Islam शिवाय भारतात कायद्याने मान्य असलेली बहुपत्नीत्वाची सूट या समाजाला कायम राखायची आहे.ज्या समाजात बहुपत्नीत्वाला खुलेआम मान्यता दिली आहे, त्या समाजात स्त्रियांना कशा पद्धतीने वागवले जात असेल, याची कल्पनाच करवत नाही. शिवाय इस्लाममधील अनेक कुप्रथा आहेतच. या गोष्टींची माहिती हिंदू मुलींना दिली जाणे, त्यावर कुटुंबात, शाळा महाविद्यालयातून, समाजमाध्यमातून साधकबाधक चर्चा होणे जागृती निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. आज भारतात अनेक ठिकाणी शरीया कोर्ट अस्तित्वात आहेत. पी. ई. डब्लू. च्या एका अभ्यासातील सर्वेक्षणानुसार भारतातील ७४ टक्के मुस्लिम लोक त्यांचे कौटुंबिक आणि वैवाहिक विवाद सोडविण्यासाठी शरीया (इस्लामिक) कोर्टाचा आधार घेणे पसंत करतात. भारतात आजच्या घडीला साधारणपणे १०० शरीया (इस्लामिक) कोर्ट अस्तित्वात असून त्याला दार-उल-कज्या असे म्हणतात. यातील बहुतेक शरीया कोर्ट हे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात कार्यरत आहेत.

बहुसंख्य हिंदू कुटुंब आणि मुलींना या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची माहितीदेखील नसते. एखाद्या तरुणाच्या दिखावटी वागणूक आणि प्रत्यक्षातील वागणूक, मानसिकता यात महद अंतर असते. कौटुंबिक आणि सामाजिक संस्कार मानवी वर्तनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात.माणसाचं सामाजिक, वैचारिक आणि खाजगी वर्तन नियंत्रित करण्यात मोलाचा वाटा उचलत असतात. वैचारिक आणि मानसिक ठेवण, चालीरीती, प्रथा, खानपान, पेहराव या सगळ्याच बाबतीत हिंदू आणि मुस्लिम समाजात महद अंतर आहे. विवाहाचा विचार करताना हिंदू तरुणींनी मुस्लिम युवक छान दिसतो, खूप मनमिळाऊ वागतो, अतिशय उदार मतं व्यक्त करतो या बाबी विचारात न घेता वरील सर्व दृष्टीने विचार करणे आज आवश्यक झाले आहे. जाता जाता एक अनुभव सांगतो. माझी एक मुस्लिम विद्यार्थिनी उच्चशिक्षित आहे. सुस्वरूप, सुस्वभावी, गुणवंत असलेल्या या विद्यार्थिनीशी व्यवसायामुळे संवाद वाढला. गुरू-शिष्याच्या नात्यात अनेकदा अनौपचारिक गप्पा होऊ लागल्या. अनेकदा परदा, हिजाब वगैरे विषयांवर गप्पा मारताना, या सर्व गोष्टींविषयी तिच्या मनात असलेला असंतोष प्रकर्षाने जाणवत असे.

कालांतराने ती एक सहकारी कर्मचारी म्हणून कामदेखील करू लागली. एकदा सहजपणे, ‘तू हिंदू मुलाशी लग्न करशील का?’ असं विचारले. तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण काय असं विचारलं तर प्रथा-परंपरा, रीतिरिवाज सगळेच वेगळे असतात आणि असं करणा-या मुलीच्या कुटुंबीयांना सगळ्याच आघाड्यांवर फटका बसतो, असे स्पष्टीकरण तिने दिले. ती मुलगी आज बिहारमध्ये समस्तिपूर येथे संपुर्ण बुरख्यात बंदिस्त आहे. पण तिने दिलेले उत्तर सगळ्या हिंदू समाजाला आणि विशेषतः हिंदू मुलींनी विचार करावा, असंच आहे.

९८८१२४२२२४

– डॉ. विवेक राजे