तरुण भारत लाईव्ह l १७ फेब्रुवारी २०२३l विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख,पाहुणे अरविंद पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका. संगीता तळेले, समन्वयिका स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या व शिवपार्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. आजच्या दिवसाचे औचित्य साधत श्री. संत गाडगेबाबा विद्यालय, भुसावळ या शाळेचे शिक्षक अरविंद पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .या व्याख्यानात पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्यात असलेले गुण विद्यार्थी दशेतील मुलांना देखील उपयोगी आहे व त्या गुणांचा वापर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कशाप्रकारे केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगाचे उदाहरण सांगून ते पूर्ण जगात वंदनीय का आहेत व त्यांना रयतेचा राजा असे का म्हटले जाते हे सांगितले तर युगल पाटील हिने शिवजयंतीचे तर एकता मुंदरा व स्पर्श वाघ यांनी शिवरात्रीचे महत्त्व सांगितले. यानंतर शाळेच्या संगीत शिक्षिका स्वाती देशमुख व शिक्षक गणेश देसले, रवींद्र भोईटे यांनी व विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला . विद्यार्थिनींनी नृत्य केले तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत व नाटिका सादर केली तर सिद्धी राणे व कार्तिकी जयकर यांनी शिवस्तुती गीतावर नृत्य सादर केले.
महाशिवरात्री व शिवजयंती का साजरी केली जाते व कशा रीतीने साजरी करतात? त्यांचे महत्त्व काय? याविषयीची सर्व माहिती विद्यार्थ्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे देण्यात आली. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज व आऊसाहेब जिजाऊ,शिव पार्वती यांच्या वेशभूषेत आले होते. यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिव गर्जनेने व हरहर महादेव च्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम कुलकर्णी , आरोही पाटील,संस्कृती जोशी, वर्णिका भोसले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मोनाली पाटील यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे प्रमुख . कल्पना सोनवणे व रूपाली पाटील , संगीता गुरव ,रोहिणी बाऊस्कर, भारती अत्तरदे , अर्चना पाटील, आशालता साळी ह्या होत्या. या कार्यक्रमास शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.