Unique Wedding Rituals : भारत हा विविध संस्कृती, चालीरीती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. प्रत्येक भागात विशिष्ट परंपरा पाहायला मिळतात, ज्या स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. अशात आज आपण अशाच एका अजब गजब प्रथेविषयी जाणून घेणार आहोत, जिथं लग्नानंतर वधूला सात दिवस विवस्त्र राहते.
ही परंपरा केवळ नववधूच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. लग्नानंतर नववधू आणि वर यांना सात दिवस एकमेकांपासून दूर राहावे लागते आणि कोणताही संवाद साधण्यास सक्त मनाई असते. एवढंच नव्हे, तर नववधू विवस्त्र राहण्याच्या या परंपरेला केवळ धार्मिक कर्तव्य म्हणूनच नव्हे, तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्व दिले जाते. सात दिवसांच्या या काळात नववधू स्वतंत्र खोलीत राहते.
या गावात केवळ लग्नानंतर नववधूंसाठीच नाही, तर संपूर्ण महिलांसाठीही एक अनोखी परंपरा पाळली जाते. श्रावण महिन्यात गावातील सर्व महिलांना पाच दिवस विवस्त्र राहावे लागते. या काळात गावातील पुरुषांना मांसाहार, नशा आणि दारूच्या सेवनापासून दूर राहण्याचा नियम घालण्यात आलेला आहे. स्थानिक समजुतीनुसार, या परंपरेचे पालन केल्याने गावात सुख-समृद्धी आणि शांतता नांदते.
‘या’ गावातील आहे ही परंपरा
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात ही परंपरा असून, अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. गावकऱ्यांच्या मते, पिनी गावाला राक्षसांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली होती. आजच्या काळातही गावातील स्त्रिया या परंपरेचे पालन करताना अंगावर एखादे पातळ वस्त्र परिधान करतात, मात्र मूळ परंपरेचा मान राखला जातो. गावकरी याला पूर्वजांचा वारसा मानतात आणि ही प्रथा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
ही परंपरा बाहेरील लोकांसाठी नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. काहींना ती विचित्र आणि अप्रचलित वाटू शकते, तर काहींना ती स्त्रीच्या मूलभूत अधिकारांवर बंधन घालणारी वाटू शकते. मात्र, स्थानिक लोक त्याला आपल्या संस्कृतीचा अभिमानास्पद भाग मानतात. ही परंपरा त्यांच्यासाठी केवळ कर्मकांड नसून सामुदायिक बंधन, श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे.
पिनी गावाची ही परंपरा भारताच्या संस्कृतिक समृद्धीचे आणि विविधतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भागात विशिष्ट परंपरा असतात, ज्या तिथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या परंपरांमध्ये प्रेम, श्रद्धा आणि इतिहासाच्या खुणा दडलेल्या असतात. जरी बाहेरील जगाला काही प्रथा वेगळ्या वाटल्या, तरी स्थानिक लोकांसाठी त्या त्यांच्या अस्तित्वाचा भाग असतात. भारतातील विविध गावांच्या अशा परंपरांमुळेच आपला देश संस्कृतीने समृद्ध आणि अद्वितीय ठरतो. हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावाचं हे ठळक उदाहरण आहे.