अग्रलेख –
अयोध्येतील रामजन्मभूमीवर मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे होत असताना रामनवमीला देशाच्या काही भागात रावणी मानसिकतेच्या काही असामाजिक तत्त्वांनी जो धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. स्वत:ला प्रधानसेवक म्हणवून घेत असलेले, पण प्रत्यक्षात रामसेवक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात रामराज्य आणण्याचा प्रयत्न करीत असताना काही शक्तींना ते खपत नाही; मान्य नाही, याची खात्री अशा घटनांनी पटते आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये, गुजरातमधील बडोदा येथे, तसेच पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी शोभायात्रेत religious riots दगडफेक करून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा काही शक्तींचा प्रयत्न होता, हे आता लपून राहिलेले नाही. बिहारची घटना वगळता अन्य राज्यांत रामभक्तांनी संयम दाखवला, तसेच पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे अनुचित घटना टळल्या ही वस्तुस्थिती असली, तरी रामनवमी शोभायात्रेत अडथळा आणण्याची काही जणांची हिंमतच कशी होते, हा खरा प्रश्न आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो; तशातलाच हा प्रकार म्हटला पाहिजे. महाराष्ट्रातील जुन्या औरंगाबाद शहराचे नाव बदलून नुकतेच छत्रपती संभाजीनगर करण्यात आले.
नामांतराचा हा प्रकार या शहरातील काही शक्तींना रुचला नसावा, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे रामनवमीचे निमित्त करून या शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही जात्यंध शक्तींनी केला, असे समजायला हरकत नाही. पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्या पेटवण्यात आल्या. दंगलखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी बुलेटच्या गोळ्या झाडण्यात आल्या.
गुजरातच्या बडोदा येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या दोन शोभायात्रांवर religious riots दगडफेक करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचाही आयोजकांचा आरोप आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही. 2014 मध्ये मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतरही देशाच्या कोणत्याही भागात जातीय दंगल झाली नाही. दंगल करणारे सर्व जण बिळात लपून बसले होते. आता हे सर्व आपल्या बिळातून बाहेर येत मोदींच्या कार्यकाळात अशा कशा सांप्रदायिक दंगली होत नाहीत, म्हणून कामाला लागले आहेत. हे एकप्रकारे पंतप्रधान मोदींना तसेच भाजपाच्या सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. पश्चिम बंगालमध्येही रामनवमीच्या शोभायात्रांवर विशिष्ट समुदायाच्या वस्तीतून दगडफेक करण्यात आली. एका विशिष्ट भागातून रामनवमीची शोभायात्रा नेऊ नये, असा ममता बॅनर्जींच्या पोलिसांचा प्रयत्न होता. ममता बॅनर्जींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी एका विशिष्ट समाजाचे हवे तेवढे लांगूलचालन करावे, पण असे करताना देशातील बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा अनादर करू नये. हिंदुस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या या देशात रामनवमीची शोभायात्रा काढता येत नसेल तर त्यापेक्षा दुर्दैवी दुसरे काही म्हणता येणार नाही. ममता बॅनर्जींना राज्यातील कायदा सुव्यवस्था राखता येत नाही, याचेच हे द्योतक आहे. अशा ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात धरणे आंदोलन करतात, यापेक्षा मोठा विनोद दुसरा कोणता असू शकत नाही. बॅनर्जींचा पंतप्रधान मोदी तसेच केंद्रातील भाजपा सरकारला असलेला विरोध लपून राहिलेला नाही. मोदींच्या विरोधासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात.
काँग्रेसच्या शासन काळात देशात जातीय आणि religious riots धार्मिक दंगली मोठ्या प्रमाणात होत होत्या. नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून देशातील सांप्रदायिक दंगली जवळजवळ संपुष्टातच आल्या. आपल्या राजकीय स्वार्थासाठी देशातील अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यकांवर अन्याय ही आतापर्यंत काँग्रेसची भूमिका होती. त्यामुळे देशातील सत्ताधारी पक्षाचे आपल्याला संरक्षण आहे; मतपेटीच्या राजकारणावर डोळा ठेवून ते आपल्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू शकत नाही, याची खात्री असल्यामुळे हा समाज मुजोर झाला होता. देशातील बहुसंख्य समाजावरचे त्यांचे अत्याचार वाढले होते. हिंदूंची धार्मिक स्थळे तसेच देवदेवतांवर हल्ले चढवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हिंदूंचा मानभंग करण्यासाठी तसेच त्यांच्या स्वाभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे खच्चीकरण करण्यासाठी अयोध्येतील राममंदिरापासून देशातील शेकडो धार्मिक स्थळांवर हल्ले चढवण्यात आले; त्यांची नासधूस करण्यात आली. हे कमी की काय म्हणून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे मशिदीत रूपांतरण करायलाही या मुजोर शक्तींनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे अयोध्येची रामजन्मभूूमी मुक्त करण्यासाठी देशातील हिंदूंना 500 वर्षे संघर्ष करावा लागला.
गेल्या काही वर्षांत देशातील हिंदू जागा झाला. आपल्यावर होणारा अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी त्याने दंड थोपटले. देशातील हिंदूंच्या धगधगत्या कोळशावर जी राख जमा झाली होती, ती उडाली आणि हिंदू अस्मिता धगधगत्या निखार्याप्रमाणे चमकू लागली. हिंदुशक्तीच्या या भगव्या ज्वाळांचे चटके अशा शक्तींना बसू लागले, त्यांचे डोळे उघडले. आताही आपण शहाणे झालो नाही, तर या देशातून परागंदा होण्याची वेळ आपल्यावर येईल, याची त्यांना खात्री पटली. मुळात या देशातील अल्पसंख्यक समाज हा देशातीलच रहिवासी आहे. या देशात राहणारा; मग तो कोणीही असो हिंदू आहे, ही रा. स्व. संघाची धारणा आहे. या धारणेनुसार संघ राष्ट्रउभारणीचे तसेच राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचे काम करीत आहे. मात्र, पाकिस्तान आपल्या देशात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्याचे आपले प्रयत्न थांबवत नाही. भारताला प्रत्यक्ष युद्धात आपण पराभूत करू शकत नाही, याची खात्री असल्यामुळे अशा शक्तींना हाताशी धरून भारताविरुद्ध छुपे युद्ध करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. काँग्रेसच्या शासन काळात अल्पसंख्यकांचे नको तितके लाड करण्यात आले. त्यामुळे ते शेफारून गेले. डोक्यावर बसले. पण देशात गेल्या जवळपास नऊ वर्षांपासून काँग्रेसचे नाही तर भाजपाप्रणीत रालोआचे राज्य आहे, मोदींचे शासन आहे. मोदींच्या काळात कायद्याने वागणार्या, तसेच या देशातील मातीवर प्रेम करणार्या अल्पसंख्यकांवर अन्याय होणार नाही, हे निश्चित. पण त्यांनी आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. जो मर्यादा भंग करेल, त्याला कायदेशीर मार्गाने वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.
त्तरप्रदेशात याची प्रचीती सातत्याने येत आहे. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारी आटोक्यातच आणली नाही, तर पूर्ण मोडून काढली आहे. राज्यातील गुन्हेगाराला त्याला समजणार्या भाषेत योगी धडा शिकवत आहेत. गुन्हेगारांच्या घराच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरवला जात आहे. त्यामुळे आता माथेफिरू लोकांनी शहाणे होण्यातच त्यांचे हित आहे. रामाला विरोध केला तर या देशात राहणे आपल्याला कठीण होऊन जाईल, याची जाणीव ठेवली पाहिजे. रावणाचे नाही तर रामाचे पूजन करण्यात आणि भजन म्हणण्यातच आपले कल्याण आहे, हे आता अशा शक्तींनी समजून घेतले पाहिजे. अन्यथा ‘हे राम’ म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही.