HSC Exam : राज्यात आजपासून महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
नेमकं काय झालं?
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने आता बोर्डाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे
इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित होता. प्रश्न क्रमांक 3 मधील उप प्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे.