यूकेमध्ये महिला खासदाराने हातात भगवद्गीता घेऊन घेतली शपथ, पाहा VIDEO

बिटन : ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर मजूर पक्षाचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. या निवडणुकीत हुजूर पक्षाच्या एका खासदाराच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण या नवनिर्वाचित खासदाराने हातात बायबल नव्हे तर भगवद्गीता गीता घेवून खासदारकीची शपथ घेतली आहे.

भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी यूकेमधील लीसेस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवत त्या खासदार झाल्या आहेत. शिवानी राजा यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती. खासदार शिवानी राजा यांची आई राजकोटच्या आहेत तर वडील गुजराती आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लीसेस्टरमध्ये झालेला आहे.

यूकेमधील लीसेस्टर पूर्व हा मजूर पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी येथून विजय मिळवला. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदार म्हणून शपथ घेतल्यावर शिवानी अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, लिसेस्टर ईस्टचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणं माझ्यासाठी सन्माननीय आहे. भगवद्गीता वर हात ठेवून महामहीम राजे चार्ल्स यांच्या प्रति आपल्या निष्ठेची शपथ घेणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.