---Advertisement---

INC New State President Update : नवा प्रदेशाध्यक्ष कोण? ‘या’ चार नावांवर हायकमांडची चर्चा सुरू

---Advertisement---

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा धक्का बसला. काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गटाला अवघ्या ५० जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने राज्यातील संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चार प्रमुख नावांवर हायकमांडमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख आणि हर्षवर्धन सपकाळ यांची नावे चर्चेत आहेत. पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी हायकमांडची भूमिका असल्यामुळे यावेळी तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पद धोक्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे, नाना पटोले यांना स्वतःच्या मतदारसंघातही निसटता विजय मिळवता आला. त्यामुळे पक्षात त्यांच्या नेतृत्वाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी बदल होणार?

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या निवडणुकांपूर्वी काँग्रेस नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करू इच्छिते. पक्षाच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींवरून येत्या काही दिवसांत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचा पुढील रणनिती काय?

राज्यात पक्षाच्या संघटनेला मजबूत करण्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षासोबतच काँग्रेस मोठ्या फेरबदलाच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना अधिक जबाबदारी देऊन आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment