---Advertisement---
जळगाव : पतीच्या अनुपस्थितीत घरात प्रियकराचा वावर वाढला. पत्नीचे संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे पतीने तिला तिच्या प्रियकराकडे सुपूर्द केले. ही घटना रावेर-बऱ्हाणपूर महामार्गावर घडली होती. मात्र, या नंतर सासरच्या मंडळींनी जावयावरच संशय व्यक्त केला. त्याच्याविरोधात पोलिस ठाणे गाठले. अखेर विवाहितेने प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पोलिसांनीच सासरच्या मंडळींना दाखवले आणि वाद मिटवला आहे.
पत्नीच्या प्रियकरासोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. प्रियकराच्या भेटीच्या ओढीत पत्नीने पतीकडे आणि संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.
त्यामुळे मानसिक त्रास सहन करणारा पती पत्नीला सोबत घेऊन मोटारसायकलने जात असताना, रस्त्यावर समोरून प्रियकर त्याच्या मोटारसायकलवरून आला. पत्नीच्या संमतीने पतीने तिला प्रियकराच्या मोटारसायकलवर बसवून त्याच्या हवाली केले.
त्यानंतर पत्नीच्या आई-वडिलांनीच जावयावरच आरोप केले. तिला जाऊ दिल्याबद्दल त्याच्यावर संशय व्यक्त केला व पोलिस ठाणे गाठले. घटनेनंतर विवाहितेने प्रियकरासोबत लग्न लावल्याचे फोटो प्रसारित झाले.
यावरून सासरच्यांनी जावयावर आरोप केले होते. अखेर विवाहितेने प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पोलिसांनीच सासरच्या मंडळींना दाखवले आणि वाद मिटवला आहे.