---Advertisement---
Jalgaon Crime : शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन एकाने तिच्याशी अंगलट करून छेडखानी केली. या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश लहू कुंभार, रा. फुलगाव, ता. भुसावळ याची माध्यमिक शिक्षण घेत असल्यापासून या तरुणीशी ओळख होती. त्याचा गैरफायदा घेऊन या तरुणीस तो ३ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे मोटारसायकलवरून घेऊन गेला.
कॉलेज सुटल्यानंतर तिला मुक्ताईनगर येथून घराकडे मोटारसायकलने घेऊन येत असताना पाऊस सुरू झाल्याचा फायदा घेत एका झाडाखाडी थांबून या तरुणीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला व मोबाईइलवर फोटो काढून ऑनलाइन बदनामी केली.
एवढेच नाही तर कोणास काही सांगितले, तर तुझा भाऊ व वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन बस स्टँडवर सोडून निघून गेला. या तरुणीने घटनेची माहिती आपल्या नातेवाइकांना दिल्यानंतर पोलिसात १० सप्टेंबर रोजी फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूच्या नशेत विवाहितेचा विनयभंग
रावेर : दारूच्या नशेत वासनांध झालेल्या रोझोदा येथील युवकाने कर्जाद परिसर रिक्षा स्टॉपजवळ उभ्या असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेच्या गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून विनय समाधान मेढे (वय २१, रा. रोझोदा, ता. रावेर) याच्या विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.