मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट समाविष्ट करणे ओबीसींवर अन्यायकारक : आ. एकनाथराव खडसे

---Advertisement---

 

जळगाव : हैद्राबाद गॅजेंटमध्ये अद्यापही संदिग्धता आहे, जर त्यात नोंदी असलेला कुणबी समाज समाविष्ट केला तर त्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र सरकट मराठा समाज समाविष्ट केला तर तीन-चार कोटी ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचं वाटणार असल्याने ,हैदराबाद गॅझेट विरोधात काही मंडळी न्यायालयात जात आहे असे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (११ सप्टेंबर) रोजा आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.

आ. एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मधील जवळीक वाढली ही राज्याच्या आणि विरोधी पक्षाच्या राजकारणासाठी चांगली बाब आहे ,त्यांची युती होऊन त्यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीमध्ये समाविष्ट व्हावे ही अपेक्षा आहे. मतदार याद्यामध्ये घोळ असल्याचं राहुल गांधी यांनी पुराव्याच्या आधारे अगोदरच सिद्ध केले आहे, अनेक ठिकाणी अशा मतदार याद्यामध्ये घोळ आहे. त्यामुळे बिहार प्रमाणे स्वच्छ मतदार याद्या केल्या जात असतील तर त्याच आपण स्वागत करायला पाहिजे.

सरकारला शेतकऱ्यांचा कापूस खरेदीत रस नाही

आ. खडसे यांनी सरकारवर कापूस आयतीच्या धोरणावर टीका केली. यात ते म्हणाले की, सरकारला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात रस नाही, देशात कापसाचे मोठे उत्पादन असताना, विदेशातून गाठी आणण्याचे धोरण चुकीचे आहे ,स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा नसल्याने सीसीआयने त्यांच्या अटी अधिक जाचक केल्याच दिसत आहे.

तर ओबीसी समाज आंदोलन करेल

मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे वारंवार मुख्यमंत्री यांनी म्हटल आहे, मात्र सातारा आणि हैदराबाद गॅजेंटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असेल तर ओबीसी समाज ही मोर्चे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पार्श्वभूमीवर पक्षाची आणि कार्यकर्त्याची भूमिका काय असावी या संदर्भात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सोबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज जळगावमध्ये आले आहेत. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी नुकतेच मराठा समाजाकडून आंदोलन झाल्याच्या नंतर आता विविध समाज आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. लिंगायत समाज आपला वेगळा धर्म असावा अशी मागणी करत आहेत . बंजारा समाज ही शेड्युल ट्रायबमधून आरक्षण मिळण्याची मागणी करत असल्याची मागणी आ. एकनाथ खडसे यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---