---Advertisement---

IND vs ENG 2nd Test : वैभव सूर्यवंशीने ज्याला ‘धु-धु धुतलं’, तोच आता टीम इंडियासाठी ठरणार डोकेदुखी !

---Advertisement---

IND vs ENG 2nd Test : नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’मध्ये (IPL 2025) वैभव सूर्यवंशीने ज्या गोलंदाजाला धु-धु धुतले, तोच आता टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेषतः हा सामना जिथे खेळवण्यात येणार आहे, तिथे टीम इंडिया आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यातच इंग्लंडने तगड्या गोलंदाजाचा संघात समावेश करून, शुभमन गिल आणि टीम इंडियासाठी ही दुहेरी समस्या उभी टाकली आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोलंदाज कोण असेल ? तर त्याचे नाव आहे जोफ्रा आर्चर. इंग्लंडने या वेगवान गोलंदाजाला दुसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान दिले आहे. आता जर आर्चर एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला तर तो टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजवेल का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/DIVzuPZsf21/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर सामन्यात नव्हे तर आयपीएल २०२५ च्या नेटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले. दोघेही आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होते. अशा परिस्थितीत, जेव्हा ते सरावदरम्यान एकमेकांविरुद्ध खेळले, तेव्हा वैभवने आर्चरवरील त्याच्या वर्चस्वाची एक उत्तम कहाणी लिहिली.

वैभव सूर्यवंशीने नेटमध्ये जोफ्रा आर्चरच्या ८ चेंडूंचा सामना केला, त्यापैकी फक्त २ वेळा वैभवला पराभव पत्करावा लागला. त्याने उर्वरित ६ चेंडू अशा प्रकारे मारले की जणू आर्चरचा फ्यूज फुटला. दरम्यान, हा व्हिडिओ वैभव सूर्यवंशीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---