तांदुळाच्या पाण्याने वाढवा केसांची चमक

तरुण भारत लाईव्ह ।२७ जानेवारी २०२३। व्यस्त जीवनशैलींमुळे आपल्याला आपल्या त्वचेची तसेच आपल्या केसांची काळजी घ्यायला जमत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे केस आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. अशावेळी योग्य आहार आणि नैसर्गिक उपायांनी केसांचे आरोग्य सांभाळता येते. काही घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घेतली जाऊ शकते. घरगुती पदार्थानी केस कसे वाढवता येतील हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

आजकाल केस सुंदर दिसावे, केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी अनेक हेअर केअर प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? तांदुळाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही केसांची चमक वाढवू शकता तसेच केसगळती रोखू शकता. तांदूळ काही तास भिजवून ठेवावे आणि त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. केस धुवायच्या अर्धातास आधी हे पाणी हातात घेऊन केसांच्या मूळांना हलकी मालीश करावी. यामुळे केसांचे मुळं मजबूत होऊन केसांची वाढ होण्यास मदत होईल.

केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या जास्त करून हिवाळ्यात पहायला मिळते. कोंड्या पासून सुटका मिळवायची असेल तर तांदुळाच्या पाण्यामध्ये कोरफड घालून केसांना लावावे आणि एक तासानंतर केस कोमट पाण्याने धुवावे असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होईल.