Gold Rate : आज सोने स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

Gold Rate : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे दैनंदिन गरजेच्या बहुतेक वस्तूंच्या किमती कमी होणार असून, अमेरिकेतील उच्च कर दबावादरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास हे पाऊल मदत करेल असे मानले जाते. दुसरीकडे मात्र, सोन्याच्या किमती सतत वाढताना दिसून येत आहेत. आज देशात २४ कॅरेट सोने १,०६,९८० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ९८,०६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८०,२४० रुपयांवर पोहोचले आहे.

जळगावमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹९६,९१०, तर २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा ₹१,०५,८०० पोहोचले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२४,००० रुपयांवर पोहोचली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने १,०७,१३० रुपये, २२ कॅरेट सोने ९८,२१० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८०,३६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने १,०६,९८० रुपये, २२ कॅरेट सोने ९८,०६० रुपये आणि १८ कॅरेट सोने ८१,१६० रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीच्या किमतीतही वाढ


मुंबईत चांदी १,२७,१०० रुपये प्रति किलो, चेन्नईमध्ये १,३७,१०० रुपये प्रति किलो आणि दिल्ली आणि कोलकातामध्ये १,७१,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---