नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक भेट दिली आहे. ती म्हणजेच उडीद, तूर या खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने मूग डाळीच्या समर्थन मूल्यात 10 टक्के वाढ केली आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकारने हा निर्णय कमी महागाईमुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे. गोयल म्हणाले की, महागाई नियंत्रित करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिकता आहे. जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याची महागाई 30% वरून 40% पर्यंत वाढली पण भारतात महागाई नियंत्रणात राहिली, फार कमी काळासाठी वाढली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत 2023-24 पीक वर्षासाठी सर्व खरीप (उन्हाळी) पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास आज मान्यता देण्यात आली.
कोणत्या पिकांना किती हमीभाव?
भात – 2183 रुपये – 143 रुपयांची वाढ
ज्वारी – 3180 रुपये – 143 रुपयांची वाढ
ज्वारी मालदांडी – 3225 रुपये – 235 रुपयांची वाढ
रागी – 3846 – 268 रुपयांची वाढ
तूर – 7000 रुपये – 400 रुपयांची वाढ
सोयाबीन – 4600 रुपये – 300 रुपयांची वाढ
मूग – 8558 रुपये – 803 रुपयांची वाढ
तिळ – 8635 रुपये – 805 रुपयांची वाढ