---Advertisement---

मोठी बातमी ! आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या मानधनात वाढ

---Advertisement---

मुंबई : आदिवासी आश्रम शाळांतील प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात १० हजारांनी वाढ करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने २०२२ साली शिक्षण सेवकांचे मानधन सुधारित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आदिवासी आश्रम शाळांतील प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात १० हजारांनी वाढ करण्यात आली आहे.

अर्थात प्राथमिक शिक्षण सेवकांचे मानधन १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन १८ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन २० हजार करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment