Ind vs Afg T20 : नेत्रदीपक आणि ऐतिहासिक विजयाने नवीन वर्षाची सुरुवात केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला अफगाणिस्तानचा सामना करायचा असून त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल. याशिवाय विराट कोहलीचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. दोन्ही स्टार खेळाडू नोव्हेंबर 2022 नंतर या फॉरमॅटमध्ये परतत आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत रोहित आणि विराट पुनरागमन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर हे दोन्ही खेळाडू या फॉर्मेटमधून बाहेर होते. हार्दिक आणि रोहित यांच्यापैकी कोणाला कर्णधारपद मिळणार, हाही प्रश्न होता.