IND VS AUS Day-Night Test : भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पहिल्याच सत्रात मोठे धक्के बसले आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे.
शुक्रवारी (६ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने गुलाबी चेंडूने गोलंदाजी करताना तीन विकेट्स घेत दबावात टाकले आहे. लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ४२ षटकात ८ बाद १७५ धावा झाल्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट गमावली होती. मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर मागील सामन्यातील दीडशतकवीर यशस्वी जैस्वालला पायचीत पकडले. त्यामुळे जैस्वाल शून्यावरच माघारी परतला.
त्यानंतर सलामीला खेळणारा केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी डाव पुढे नेला होता. यादरम्यान आठव्या षटकात स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर केएल राहुलला दोनदा जीवदानही मिळाले. त्याचा फायदा त्याने घेण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल आणि गिल यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली.
पण, मिचेल स्टार्क पुन्हा पुढील स्पेल टाकण्यासाठी गोलंदाजीला आला आणि त्याने १९ व्या षटकात केएल राहुलला नॅथन मॅकस्विनीच्या हातून झेलबाद केले. केएल राहुल ६४ चेंडूत ३७ धावा केल्या. लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ४२ षटकात ८ बाद १७५ धावा झाल्या आहेत.