---Advertisement---

Ind vs Aus Final : विश्वचषक अंतिम सामन्यात इस्त्रालय-हमास युध्दाचे सावट? काय घडलं

---Advertisement---
गांधीनगर : जगभरात सध्या एका युध्दाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. इस्त्रालय-पॅलेस्टाईन युध्दाची आठवण भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामन्यात क्रकेटरसिकांना यावेळी आली. या अंतिम सामन्याच्या १४व्या षटकावेळी विराट कोहलीला मिठी मारण्याकरिता पॅलेस्टाईन समर्थक हातात झेंडा आणि चेहऱ्यावर मास्क घालत कॅमेऱ्यात कैद होण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याकरिता तो तरुण मैदानात सरसावल्याचे पाहायला मिळाले. परंतु, विराट कोहलीने याकडे साफ दुर्लक्ष केले. दरम्यान, अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने पॅलेस्टाईन ध्वजासमान चेहऱ्यावर मास्क लावले होते.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने तीन विकेट गमावल्या आहेत. भारत आता ३ बाद १०१ धावा विराट कोहली ३३ धावा आणि राहूल १० धावावर नाबाद आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment