IND vs BAN 1st Test : टीम इंडियाचा बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिला डाव हा दुसऱ्या दिवशी 376 धावांवर आटोपला. त्यानंतर बांगलादेशी संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली.
त्यांनी अवघ्या 22 धावांवर आपले तीन फलंदाज गमावले. लंच ब्रेकनंतर शांतोच्या रूपात त्यांना चौथा फलंदाज बाद झाला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विराटकरवी झेलबाद केले. शांतोने आपल्या खेळीत 30 चेंडूत 20 धावांची खेळी केली.
भारतीय संघाचा पहिला डाव बांगलादेशला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गुंडाळला. आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांच्या १९९ धावांची भागीदारीने भारताला ६ बाद १४४ धावांवरून ३४३ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर भारताचा उर्वरित संघ ३७६ धावांवर तंबूत परतला. हसन महमूदने पाच विकेट्स घेतल्या.
३ बाद ३४ अशा दयनीय अवस्थेतून भारताला यशस्वी जैस्वाल ( ५६) आणि ऋषभ पंत ( ३९) यांनी ९२ धावांची भागीदारी करून सावरले होते. त्यानंतर आर अश्विन व जडेजा जोडी चमकली.
या दोघांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडून अनेक विक्रम मोडले. अश्विन १३३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर झेलबाद झाला.