विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने पहिल्या दिवशी 6 विकेट गमावत 336 धावा केल्या. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अप्रतिम खेळी केली. त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जैस्वाल १७९ धावांवर नाबाद राहिला. जैस्वालने शतक झळकावले पण इतर फलंदाज अपयशी ठरले. शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएस भरत या सर्वांनी सुरुवात केली पण विकेट फेकून ते निघून गेले. एकाही फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केले नाही.
IND vs ENG Live : यशस्वीने टीम इंडियाचा उचलला निम्मा भार; यशस्वीच्या 179 तर भारताच्या 336 धावा !
Published On: फेब्रुवारी 2, 2024 5:52 pm

---Advertisement---