IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यात भारतीय संघात दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यांत न्यूझीलंडकडून २१ धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडवर ६ विकेट्सनी थरारक विजय मिळवला होता.
त्यामुळे तीन सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत आली आहे. आता तिसरा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघासाठी करो या मरो असाच असेल.
दरम्यान, या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नवा डाव टाकत संघामध्ये दोन मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी पोषक होती. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने यजुवेंद्र चहलला संधी दिली होती. आता तिसऱ्या सामन्याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असले, त्यामुळे युजवेंद्र चहलला संघाबाहेर केले जाऊ शकते.
चहलच्या जागी वेगवाग गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळू शकते. उमरानकडे अतिरिक्त गती असल्यामुळे तो न्यूझीलंडच्या हुडासारखे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्याची खेळपट्टी पाहता चहलला भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.