IND vs SA । दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील चौथा सामना भारताने एकहाती जिंकला आणि मालिकाही आपल्या नावे केली. भारताच्या फलंदाजांनी वांडरर्स स्टेडियमवर आफ्रिकन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. आफ्रिकेसमोर २८४ धावांचे मोठे लक्ष्य असताना भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव १४८ धावांवरतीच आटपला. मात्र, मालिका जरी भारताने जिंकली असली तरी दक्षिण आफ्रिकेने त्यांचे ‘उद्दिष्ट’ पूर्ण केले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने नेहमीप्रमाणेच आक्रमक भुमिका घेत आफ्रिकन गोलंदाजांना हैरान केले. भारताने दिलेल्या २८४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने डावाची सुरूवात खराब केली. अवघ्या १० धावांवर त्यांनी ४ आगामी फलंदाजांचे विकेट्स गमावले. त्यापैकी ३ विकेट्स वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने घेतले.अर्शदीपने अवघ्या एका धावेवर आफ्रिकेच्या स्पोटक फलंदाजीला सुरूंग लावला. सलामीवीर रीझा हेन्ड्रिक्सला शुन्यावर माघारी पाठवले. त्यामागोमाग दुसऱ्या षटकात रायन रिकेल्टन हार्दिक पांड्याने बाद केले. त्यानंतर ८ धावांवर खेळत असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर कर्णधार एडन मार्करामने हवेत उंच फटका खेळला आणि चेंडूखाली असलेल्या रवी बिश्नोईने सावधपणे सुंदर झेल केला. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हेन्रिक क्लासेनला अर्शदीपने पायचीत केले. क्लासेनला खाते न खोलताच तंबूत परतावे लागले.अर्शदीपने या ३ विकेट्सह त्याने परदेशी मैदानावरील ७१ ट्वेंटी-२० विकेट्सचा आकडा पुर्ण केला. उशीरा पदार्पण करूनही अर्शदीप भारतासाठी परदेशी मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. त्याचबरोबर भारतासाठी सर्वाधिक ट्वेंटी-२० घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अर्शदीप अवघे २ विकेट्स दूर आहे. त्याने अवघ्या ६० सामन्यांमध्ये ९५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० विकेट्स घेतले आहेत. ८० सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल या यादीत पहिल्या स्थानी आहे.
अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेने या 4 सामन्यांच्या T20 मालिकेतून सुमारे 600 दशलक्ष रँड म्हणजेच सुमारे 238 कोटी रुपये कमावले. या मालिकेतून जास्तीत जास्त पैसे कमवणे हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा उद्देश होता, जो पूर्ण झाला आहे.