IND vs SA : टीम इंडियाचे मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडली असून पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.