टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघा 83 धावांत गुंडाळले.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. विराट कोहलीने आपले ऐतिहासिक 49 वे वनडे शतक ठोकले. त्याने नाबाद 101 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 77 धावांचे योगदान दिले.
रोहित शर्माने सुरूवातीला आक्रमक फलंदाजी करत 40 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 29 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 22 तर शुभमन गिलने 23 धावांचे योगदान दिले.