IND vs SA Final : अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास काय होणार ?

IND vs SA Final : T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका प्रथमच, तर टीम इंडिया 10 वर्षांनंतर पोहचली आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे 29 रोजी बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार हे नक्की. पण त्या आधीच हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कोण ? हे जाणून घेऊया.

 

पावसामुळे सामना झालाच नाही तर विजेत्या कोणाला घोषित केलं जाईल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर सुपर 8 फेरीत टॉप असलेल्या संघाला पुढची संधी दिली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. दोन्ही उपांत्य फेरीचे व्यवस्थितरित्या पार पडले. भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला पण सामना पूर्ण झाला. अंतिम फेरीसाठी असा काही वेगळा नियम नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.