IND vs SL : श्रीलंकेला पहिला धक्का, सिराजने घेतली विकेट

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. या मैदानात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा दिसला आहे. त्यामुळे श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं.

या खेळपट्टीवर 270 च्या आसपास धावसंख्या होऊ शकते असा अंदाज आहे. असं असताना भारतीय संघाच्या हातावरील काळ्या पट्टीने लक्ष वेधून घेतलं आहे. काही जणांना या मागचं कारण माहिती आहे.

तर काही जणांना असं का? असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला येथे मिळेल. दोन दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं होतं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत.